Satyam Jewellers Blog
This is some blog description about this site
सत्यम ज्वेलर्स चे ब्रीद : स्त्रीत्वाचा सन्मान !
- Font size: Larger Smaller
- Hits: 32682
- Subscribe to this entry
- Bookmark
सत्यम ज्वेलर्स चे ब्रीद : स्त्रीत्वाचा सन्मान !
सुवर्णालंकार म्हटले कि,ते स्री सौंदर्याशी निगडीत असतात, हे उघड आहे. परंतु स्त्रीचे बाह्य सौंदर्यच न पाहता तिचे आंतरिक सौंदर्य पाहणे तितकेच आवश्यक आहे. स्त्रीच्या नात्यामध्ये वैविध्य असते. ती कन्या,बहिण सून,माता अश्या अनेक भूमिका समाजात बजावत असतात. प्रत्येक भूमिकेत आपले वेगळे कर्तव्य निभावत असतात. स्त्रीच्या याच गुणकर्तृत्वाकडे पाहणे आजमितीला गरजेचे बनले आहे,हाच दृष्टीकोन मनात बाळगून अगदी स्थापनेपासून सत्यम ज्वेलर्स स्त्रीकडे पाहत आले आहे. फक्त व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता, आपण समाजाचे - विशेषतं: स्त्री जातीचे काही देणे लागतो. या जाणीवेतून सत्यम ज्वेलर्स ने स्त्रियांसाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहे. म्हणूनच सत्यम ज्वेलर्स चे ब्रीद : स्रीत्वाचा सन्मान हे राहिले आहे.
आजघडीला स्त्री कौटुंबिक आणि सामाजिक अन्याय,अत्याचाराला सामोरी जाताना दिसत आहे,छेडछ्याड,बलात्कार हे तिच्या पाचवीलाच पूजले आहेत. असे असताना स्त्रीला निर्भीड बनवून योग्य दिशा देण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे, हाच विचार मनात बिंबवून सत्यम ज्वेलर्स स्त्रीविषयक उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेत असते, रक्षाबंधनाचे महत्व विशद करून "सत्यम ने स्त्री रक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री हि प्रेमळ बहिणीची कुटुंबात महत्वाची भूमिका बजावत असते तेव्हा तिचे सर्वार्थाने रक्षण करावे,हि जशी भावाची महत्वाची जबाबदारी असते. तशीच कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आहे. हेच सांगण्याचे महाकार्य सत्यम ने आपल्या जाहिराती आणि उपक्रमातून केला आहे.
स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून स्त्रीमुक्तीचा नारा सत्यम ने दिला आहे. आजही स्त्री अनेक प्रकारच्या बंधनात बद्ध असल्याचे आपणास दिसून येते. चूल आणि मुल एवढीच तिची समाजात जबाबदारी आहे का?तर नाही. खरे तर स्त्रीला समाजाने नवे क्षितीज खुले करून द्यायला हवे, एक नवी भरारी घेण्यासाठी स्त्रीला समाजाने नवे पंख देण्याची गरज आहे पारतंत्र्याचे जोखड झुगारून, रूढी परंपरा तोडून स्त्रीला क्षितिजापार भरारी घेण्यासाठी समाजाने प्रवृत्त करायला हवे. पण तसे फार क्वचितच होताना दिसते. पण जे स्त्रीला गुलामगिरितून मुक्त करू पाहतात त्यात सत्यम ची तळमळ अधिक असल्याचे दिसते. स्वतान्त्रादिनानिमित त्यांच्या घोषवाक्यात याचा प्रत्यय येतो. स्त्रीला स्वतंत्र, मुक्त केल्याने समाज झपाट्याने प्रगती पथावर चालू शकेल, असा सत्यमचा विश्वास आहे.
आताही सत्यम ज्वेलर्स ने हाच ध्यास घेतला आहे स्त्रीचा आदर करीत त्यांनी लेक माझी लकी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या लेकीचा सन्मान केला पाहिजे,हा या उपक्रमामागचा हेतू आहे. स्त्रीत्वाचा सन्मान आपल्या घरापासून सुरु होतो. हा संदेशही यामागे आहे केवळ व्यवसाय हाच उद्देश न ठेवता ग्राहकांमध्ये आपुलकी आणि स्नेहाचे नाते निर्माण व्हावे हासुद्धा या उपक्रमामागे उद्देश आहे.
सत्यम ज्वेलर्स मधील खरेदीवर विविध बक्षिसे मिळवून, ग्राहक आपल्या लाडक्या लेकीला लकी करू शकणार आहे. ग्राहकांच्या लाडक्या लेकींसाठी सत्यम ज्वेलर्स ने अगदी अलिशान कारपासून लेपटोप, मोबाईल अशी बक्षिसे जाहीर केली आहेत ग्राहकांनी 'लेक माझी लकी ' करण्यासाठी या नव्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा, असे सत्यम ज्वेलर्स कडून ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे.