सत्यम ज्वेलर्स चे ब्रीद : स्त्रीत्वाचा सन्मान ! सुवर्णालंकार म्हटले कि,ते स्री सौंदर्याशी निगडीत असतात, हे उघड आहे. परंतु स्त्रीचे बाह्य सौंदर्यच न पाहता तिचे आंतरिक सौंदर्य पाहणे तितकेच आवश्यक आहे. स्त्रीच्या नात्यामध्ये वैविध्य असते. ती कन्या,बहिण सून,माता अश्या अनेक भूमिका समाजात बजावत असतात. प्रत्येक भूमिकेत आपले वेगळे कर्तव्य निभावत असतात. स्त्रीच्या याच गुणकर्तृत्वाकडे पाहणे आजमितीला गरजेचे बनले आहे,हाच दृष्टीकोन मनात बाळगून अगदी स्थापनेपासून सत्यम ज्वेलर्स स्त्रीकडे पाहत आले आहे. फक्त व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता, आपण समाजाचे - विशेषतं: स्त्री जातीचे काही देणे लागतो. या जाणीवेतून सत्यम ज्वेलर्स ने स्त्रियांसाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहे. म्हणूनच सत्यम ज्वेलर्स चे ब्रीद : स्रीत्वाचा सन्मान हे राहिले आहे.
आजघडीला स्त्री कौटुंबिक आणि सामाजिक अन्याय,अत्याचाराला सामोरी जाताना दिसत आहे,छेडछ्याड,बलात्कार हे तिच्या पाचवीलाच पूजले आहेत. असे असताना स्त्रीला निर्भीड बनवून योग्य दिशा देण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे, हाच विचार मनात बिंबवून सत्यम ज्वेलर्स स्त्रीविषयक उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेत असते, रक्षाबंधनाचे महत्व विशद करून "सत्यम ने स्त्री रक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री हि प्रेमळ बहिणीची कुटुंबात महत्वाची भूमिका बजावत असते तेव्हा तिचे सर्वार्थाने रक्षण करावे,हि जशी भावाची महत्वाची जबाबदारी असते. तशीच...